डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श समाजाने घ्यावा- तुकाराम बाबा महाराज.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- (राजू ऐवळे) मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारताचे ११ वे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र हे समाजाला दिशा देणारे आहे. देशसेवेसाठी आपले सर्वस्व पणाला लावलेल्या कलाम हे शेवटच्या श्वासापर्यत देशासाठी कार्यरत राहिले. साधी राहणी, उचच विचार व मनात ठासून भरलेली देशभक्ती म्हणजे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम होय. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श समाजाने घ्यावा असे आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे शिव कलाम फौंडेशनच्या वतीने भारताचे ११ वे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या जीवनावरील चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. 
प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी तुकाराम बाबा बोलत होते. यावेळी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांची उपस्थिती होती. प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
तुकाराम बाबा महाराज म्हणाले, विज्ञानाने माणसाची प्रगती झाली पण आज माणूस माणसापासून दुरावत चालला आहे. माणसाने माणुसकी जपावी, एकमेकाला मदतीचा हात द्यावा. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना नेमके हेच कार्य करत आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर विज्ञानाबरोबरच थोरामोठांचा संघर्ष, त्यांचे जीवन, त्याग समजून घेणे काळाची गरज आहे.
पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी आपण एक दिवस माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासमवेत घातला असून आजही त्यांची आठवण ताजी असल्याचे संगितले. डॉ. कलाम यांच्या विचारांवर नवी पिढीने वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कलाम फौंडेशनचे अध्यक्ष अयाज शेख, जब्बार तांबोळी, राजू मणेर, संभाजी भोसले , इम्रान तांबोळी, जब्बार मुजावर, सद्दाम हिरा मणेर, असिफ मणेर, अकीब मणेर, वसीम मुजावर, सद्दाम खाटीक, तोफीक गलगले, निसार तांबोळी, नितीन कुलकर्णी, श्री. मुजावर आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन