श्रीकांत सोनवने यांनी प्रभाग ८ मध्ये स्वतःच्या सहकार्यने केले गटाराचे साफ सफाई.
दिव्यराज न्युज नेटवर्क :-(राजू ऐवळे) प्रभाग क्र. 8 मध्ये दुधाळ वस्ती ते बसवेश्वरनगर, विद्यानगरकडे जाणाऱ्या मार्गावर गटार व पाईप न घातल्यामुळे पावसाचे पाण्याने गटारी तुंबून नागरीवस्तीमध्ये तसेच रस्त्यावरती थांबून राहत होते. त्यामुळे त्या भागात अतिशय दुर्गंध वास येऊन लहान मुले व तेथील नागरिकांच्या आरोग्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता अशी परिस्थिती गेली पाच ते सहा वर्षे तेथील नागरिक सहन करत होते.
योग्य वेळी त्या भागातील नागरिकांनी बहुजन समाज पार्टीचे उपाध्यक्ष युवा नेते श्रीकांत सोनवणे यांना ही दुर्दैवी गोष्ट सांगितली तेव्हा श्रीकांत सोनवणे यांनी लागलीच जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधून या कामाचा पाठपुरावा केला स्वतः समोर थांबून दुधाळ वस्ती, बसवेश्वर नगर येथे JCB मशीन च्या सहाय्याने घाण पाणी जाण्यासाठी सिमेंट पाईप स्वतः समोर थांबून बसवून घेतल्या त्यामुळे दुधाळ वस्ती, बसवेश्वर नगर या भागात श्रीकांत सोनवने यांची कैतुक होत आहे.
Comments
Post a Comment