राजे रामराव महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ विभागीय व आंतर विभागीय मैदानी स्पर्धांचे आयोजन- सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातून ४५० हून अधिक खेळाडूंचा सहभाग.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत(राजू ऐवळे):- जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर दि. २ व ३ नोव्हेंबर 2022 रोजी शिवाजी विद्यापीठ सांगली विभागीय मैदानी स्पर्धेचे व दि. ७ ते ९ नोव्हेंबर 2022 यादरम्यान शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील व उपप्राचार्य प्रा. सिद्राम चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
      पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सांगली जिल्हा विभागीय व आंतर विभागीय स्पर्धेमध्ये सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातून ४५० हून अधिक विविध खेळ प्रकारातील खेळाडू सहभागी होणार आहेत. सदर मैदानी स्पर्धेमध्ये लघु, मध्यम व लांब पल्ल्याचे धावणे, उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी, बांबु उडी, गोळा, थाळी, भाला, हातोडा फेक, अडथळा शर्यत इ. खेळ प्रकार खेळले जाणार आहेत. या मैदानी खेळाचे नियोजन प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखानाप्रमुख प्रा. अनुप मुळे व प्रा. दीपक कांबळे पाहत आहेत. या मैदानी स्पर्धेला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा सौ.  शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, प्रशासन सहसचिव प्राचार्य राजेंद्र शेजवळ व अर्थसचिव सिताराम गवळी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

13 मे हा दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभर “समर्पण दिवस” म्हणून साजरा केला जातो.

जत येथील सोहन ठोंबरे यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची पीएच. डी.