राजे रामराव महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिननिमित्त एकता दौड संपन्न. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजन
दिव्यराज न्युज नेटर्क जत:प्रतिनिधी :- केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या व महाराष्ट्र शासनच्या आदेशान्वये स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस व एकता दौडीचे आयोजन राजे रामराव महाविद्यालयात करण्यात आले होते. सकाळी ठीक ७.३० वा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम सन्नके व उपस्थितांनी राष्ट्रीय एकता दिनाचे वाचन केले व उपस्थित प्राध्यापक व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथ दिली. यानंतर राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता दौडीचे आयोजन जत शहरामध्ये करण्यात आले होते. यामधे महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. शिवाजी कुलाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र लवटे, प्रा. पुंडलिक चौधरी, प्रा. तुकाराम सन्नके, राष्ट्रीय सेवा योजना समितीतील सर्व सदस्य, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्रा. पांडुरंग सावंत, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते. एकता दौडीनंतर महाविद्यालयात या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
Comments
Post a Comment