येळवी येथे श्री संत बाळूमामा मंदिराच्या भूमीपूजन सोहळा, तुकाराम बाबा व प्रकाश जमदाडे यांची प्रमुख उपस्थितीत पार पडला.
दिव्यराज न्युज नेटवर्क :- जत तालुक्यातील येळवी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान नियोजित श्री संत बाळूमामा यांच्या मंदिराच्या भूमिपूजन सोहळा दसऱ्या दिवशी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, येळवीचे सरपंच विजयकुमार पोरे, उपसरपंच सुनील अंकलगी, येळवी सोसायटीचे चेअरमन संतोष स्वामी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आले.
प्रास्ताविकपर भाषणात बोलताना मारुती मदने यांनी प्रतिष्ठान व मंदिराच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत, विद्यार्थ्यांना सहकार्य त्याच बरोबर अध्यात्मिक व धार्मिक कार्य हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रकाश जमदाडे म्हणाले, प्रतिष्ठान व देवस्थानच्या माध्यमातून गोरगरिबांची निरपेक्ष, निस्वार्थी सेवा करा असे आवाहन केले. येळवी येथे उभारण्यात येत असलेल्या मंदिराला सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही प्रकाश जमदाडे यांनी दिली.
अध्यक्षीय समारोपात बोलताना तुकाराम बाबा महाराज यांनी समाजकारण, राजकारण व अध्यात्म विषयाला स्पर्श करताना दुसऱ्याचे अवगुण बघण्यापेक्षा गुण पहा, एखाद्याने चांगले कार्य हाती घेतले तर त्याची निंदा न करता मदत करा, त्यांना सहकार्य करा असे आवाहन तुकाराम बाबांनी केले.
यावेळी खैरावचे सरपंच राजाराम घुटुकडे, येळवी सोसायटीचे संचालक बाबासो वगरे, सचिन माने, ओंकारस्वरूपाचे संस्थापक अध्यक्ष दीपक अंकलगी, सचिव संतोष पाटील, मुख्याध्यापक नंदकुमार खंडागळे, भारत क्षीरसागर, राजकुमार धोत्रे, आप्पासो व्हनमाने, आंनदा पाटील, आंनदा क्षीरसागर, गौडाप्पा यमगर, हरी भंडे, वसंत भंडे, सुधाकर पतंगे, गौरीहर पतंगे, महेश मालगत्ते, शिवाजी आवटे, प्रवीण तोडकर, कोंडीबा माने, धोंडीराम कुलाळ, पांडुरंग डोंबाळे, म्हाळाप्पा काळे, गोरख वगरे,हुसेन नाईक देवाप्पा कोडलकर , आंनदा रुपनूर, संपत व्हनमाने बाळासो चव्हाण, जालिंदर सांगोलकर, राजाराम शिंदे, डॉ. विवेकानंद स्वामी, लिंबाजी सोलनकर, विजय रुपनूर, रविकिरण पवार, अँड. सागर व्हनमाने, गजानन पतंगे, संतोष पोरे, तुकाराम सुतार, नवनाथ पवार, भाऊसो खरात, रेवणराज येवले, शुभम पोतदार, समाधान यादव, आकाराम सोलनकर, ज्ञानेश्वर माने, दीपक चव्हाण, बापू चव्हाण, तानाजी व्हनमाने, आंनदा मदने, कोंडीबा घुटुकडे,खाजेसाब नाईक, फारुख नाईक, बंडु चौगुले, युवराज जिपटे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment