नवीन शैक्षणिक धोरण हे व्यापक व बहुशाखीय:- डॉ. मिलिंद करंजकरराजे. रामराव महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० कार्यशाळेचे आयोजन
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- राष्ट्रीय शिक्षण धोरण हे व्यापक, आधारभूत, बहु-शाखीय , लवचिक अभ्यासक्रमासह सर्वसमावेशक पदवी शिक्षण अभ्यासक्रम , विषयांचे सर्जनशील संयोजन, व्यावसायिक शिक्षणाचे एकात्मीकरण आणि योग्य प्रमाणीकरणासह बहूप्रवेशीय असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरण निर्मितीचे प्रमुख डॉ. मिलिंद करंजकर यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०: संधी व आव्हाने या विषयावर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व प्राध्यापक प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवशीय कार्यशाळेत प्रमुख साधन व्यक्ती म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते.
या कार्यशाळेचे दुसरे साधन व्यक्ती प्रा. सुनील मालगावकर यांनी पदवी अभ्यासक्रम व त्याच्या निर्गम टप्प्यांची महिती करून दिली. पदवी शिक्षण ३ किंवा ४ वर्षांचे असू शकते आणि या कालावधीत अनेक निर्गमन पर्याय आणि योग्य प्रमाणीकरण असू शकतात. उदा. १ वर्षानंतर प्रमाणपत्र, २ वर्षानंतर प्रगत पदविका, ३ वर्षांनंतर बॅचलर डिग्री आणि ४ वर्षानंतर बॅचलर विथ रिसर्च असे टप्पे असल्याचेही ते म्हणाले.
Comments
Post a Comment