छत्रपती शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन आदर्शवत: डाॅ. रामभाऊ मुटकुळे, जतच्या राजे रामराव महाविद्यावयात एकदिवशीय कार्यशाळा संपन्न.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या इतिहास विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने 'शिवचरित्रापासून काय शिकावे' या विषयावर एकदिवशीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे साधन व्यक्ती म्हणुन प्रा. डाॅ. रामभाऊ मुटकुळे तर अध्यक्षस्थानी डाॅ. बी. एम. डहाळके उपस्थित होते.
कार्यशाळेत प्रमुख साधन व्यक्ती म्हणुन बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन, स्त्रीविषयक व पर्यावरणविषयक दृष्टिकोन, गुप्तहेर यंत्रणा या बाबी वर्तमान पिढीला मार्गदर्शक व आदर्शवत आहेत. महाराजांचे कार्य जगातील अनेक देशांना मार्गदर्शक ठरले आहे. त्यांनी राबविलेले जलव्यवस्थापन व गुप्तहेर यंत्रणा इस्राईल सारख्या देशांनी अंगीकारल्या आहेत. त्यांच्या जलव्यवस्थापनामुळे जमिनीच्या आतील पाण्याची पातळी वाढली. शिवाजी महाराजांची नियोजन करण्याची पद्धत वर्तमान पिढीला मार्गदर्शन करणारी आहे, असेही ते म्हणाले.
डाॅ.बी.एम.डहाळके यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य लोककल्याणकारी राज्य होते, असे मत व्यक्त केले. यावेळी इतिहास विभागप्रमुख प्रा. पी. जे. चौधरी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समाज कसा असावा याचा आदर्श आपल्या कृतीतून समाजासमोर ठेवला आहे. धर्मनिरपेक्षता शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा स्तंभ होता.
Comments
Post a Comment