राजे रामराव महाविद्यालयात आज भव्य रक्तदान शिबिर. एचडीएफसी बँक शाखा-जत, माजी विद्यार्थी संघटना, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत:- दि.24. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय
छात्र सेना, माजी विद्यार्थी संघटना, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व एचडीएफसी बँक शाखा जत यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहीती  महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम सन्नके, प्रा. पुंडलिक चौधरी, डाँ. राजेंद्र लवटे तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे पांडुरंग सावंत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डाँ. शिवाजी कुलाळ व एचडीएफसी बँकेचे अधिकारी युवराज खरात उपस्थित होते. 
        यावेळी अधिक माहिती देताना प्राचार्य म्हणाले, रक्तदान हे जीवनदान असून महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थी व जत परिसरातील नागरिकांनी महाविद्यालयात येऊन रक्तदान करावे. रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि चांगले शारीरिक आरोग्य लाभते, असे तज्ज्ञांचं म्हणणे आहे. रक्तदान करुन तुम्ही केवळ एखाद्याचे आयुष्य वाचवण्याचे महान कार्य करत नाही तर ही प्रक्रिया तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. रक्तदानामुळे शरीर आणि मन दोहोंवर प्रचंड सकारात्मक परिणाम होतो. रक्तदानाच्या आरोग्यदायी फायद्यांपासून दुर्दैवानं बरेच जण अनभिज्ञ आहेत. त्यामुळे रक्तदानाबाबत जनजागृती होणे गरजेचं आहे. 18 ते 60 वर्ष या वयोमर्यादेतील कोणत्याही व्यक्ती रक्तदान करू शकतात. फक्त यासाठी केवळ काही महत्त्वपूर्ण बाबींसहीत निरोगी आयुष्य असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन