जतेत शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय मैदानी स्पर्धां संपन्न. राजे रामराव महाविद्यालयाकडुन यशस्वी आयोजन
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- दि.10. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर दि. 7, 8 व 9 नोव्हेंबर 2022 रोजी 58 वी शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय मैदानी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचा समारोप समारंभ राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर विवेकांनद महाविद्यालय कोल्हापुरचे प्रा. किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य व समारोप समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेश पाटील म्हणाले, खेळामध्ये जय-पराजय होत असतो, पण खिलाडूवृत्ती ही माणसाच्या आयुष्यात फार महत्वाची गोष्ट आहे. ती वृद्धिंगत करण्यासाठी आपणांस खेळाशिवाय पर्याय नाही. गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड मेहनत घेऊन विजयी झालेल्या आणि काही अंशी कमी पडलेल्या सर्व खेळाडूंना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जिद्दीने उभे रहा, आपले महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ, राज्य व पर्यायाने देशाचे नाव रोशन कराल अशी मला खात्री आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रा.किरण पाटील म्हणाले, यापुढील स्पर्धेत विजयी खेळाडूंनी शिवाजी विद्यापीठाचे व राज्याचे नाव उंचवावे, एवढीच आपणाकडून अपेक्षा आहे.
शिवाजी विद्यापीठ आतंरविभागीय मैदानी स्पर्धेमध्ये लघु, मध्यम व लांब पल्ल्याचे धावणे, उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी, बांबु उडी, गोळा, थाळी, भाला, हातोडा फेक, अडथळा शर्यत इ. खेळ प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धेत विजय संपादन केलेल्या खेळाडूंना सांगता समारंभाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
*या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे:-*
शिवाजी विद्यापीठ सांघीक सर्वसाधारण विजेतेपद - (कायम फिरता चषक) शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज
शिवाजी विद्यापीठ सांघिक उपविजेतेपद- नाईट काँलेज, कोल्हापुर
तृतीय क्रमांक- न्यु काँलेज, कोल्हापुर
वैयक्तीक सर्वसाधारण विजेतेपद महिला - (यादगिरी फिरता चषक) रिया नितीन पाटील, विवेकानंद महाविदयालय, कोल्हापुर
वैयक्तीक सर्वसाधारण विजेतेपद पुरुष - रोहन गौतम कांबळे, नाईट काँलेज, कोल्हापुर
पुरुष सर्वसाधारण सांघीक विजेतेपद - नाईट काँलेज, कोल्हापुर
पुरुष सर्वसाधारण सांघीक उपविजतेपद - न्यु काँलेज, कोल्हापुर
पुरुष सर्वसाधारण सांघीक तृतीय क्रमांक - शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज
महिला सर्वसाधारण सांघीक विजेतेपद - शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज
महिला सर्वसाधारण सांघीक उपविजतेपद - डी पी भोसले महाविद्यालय, कोरेगाव
महिला सर्वसाधारण सांघीक तृतीय क्रमांक - वाय सी आय एस सातारा.
या समारोप समारंभाचे सूत्रसंचालन स्पर्धा संयोजक तथा राजे रामराव महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.सिद्राम चव्हाण यांनी केले तर आभार शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अनुप मुळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी आकाश बनसोडे, योगेश एडके,संतोष मोटे,सुमित जगधने उपस्थित होते. या स्पर्धेचे नियोजन प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखानाप्रमुख प्रा.अनुप मुळे, प्रा.दीपक कांबळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पाहिले. शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, प्रशासन सहसचिव प्राचार्य राजेंद्र शेजवळ व अर्थसचिव सिताराम गवळी यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment