पोलिसांचे निलंबन करण्यापेक्षा वाचाळविर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना घरी बसवा :- सुनिल बागडे.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- महापुरुषांची राजकीय नेते मंडळी यांच्याकडून वारंवार जाणीवपूर्वक बदनामी होत आहे त्यामुळे सर्व सामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राजकीय नेत्यांनी त्यांची भाषा सुधरावी असे मेत प्रहारचे अध्यक्ष सुनिल बागडे यांनी दिव्यराजशी बोलताना केली.
ते पुढे म्हणाले की राजकीय नेत्यांनी तोंडाला येईल ते बेताल वक्तव्य करायचं आणि पोलिसांना बळीचा बकरा ठरवायचं चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी शाई फेक करण्यात आली याप्रकरणी कामात हलगर्जीपणा केलेबद्दल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयातील 11 पोलिसांना निलंबित करण्यात आले. मुळात चंद्रकांत पाटील हे एका पदाधिकाऱ्याच्या घरी गेले होते त्यावेळी तेथून बाहेर पडताना अनेक लोक त्या ठिकाणी होते त्यावेळी त्यांच्यावर शाई फेकली मात्र या घटने बद्दल पोलिसांना जबाबदार धरण कितपत योग्य असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर विधान करणं अत्यंत चुकीचं आहे. राज्यात सध्या राजकीय मंडळी कडून बेताल वक्तव्य करण्याची स्पर्धाच लागली आहे वाट्टेल ते बरळले जात आहे महापुरुषांची बदनामी केली जात आहे.
राज्यात सध्या राजकीय मंडळी कडून वादग्रस्त विधान करण्याची सत्र सुरूच आहे यामध्ये राज्यपाल भगत सिंग कोशारी यांच्यापासून वेगवेगळ्या पक्षाचे नेते , आमदार , मंत्री यांचा समावेश आहे प्रत्येक वेळी पोलिसांनाच बकरा करण्यापेक्षा वादग्रस्त बरळनाऱ्या नेत्यांना घरी बसवा आणि त्या 11 पोलिसांचे निलंबन मागे घ्या असे बागडे म्हणाले.
Comments
Post a Comment