जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने महात्मा फुले पुण्यतिथी साजरी.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :-  सोमवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी  नदाफ मल्टीपर्पज हॉल सातारा रोड ,जनावर बाजार शेजारी जत येथे जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने महात्मा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात  आली.
यावेळी प्रा.पांडूरंग वाघमोडे सर म्हणले की भाषणे ऐकून  सोडून देण्यापेक्षा महात्मा फुले यांच्या विचारावर संवाद साधून चर्चा करून अमलात आणले पाहिजे. तसेच सत्यशोधक धर्माचे महत्व सांगितले.
  थोर समाजसुधारक महापुरुषांचा रोख विषमतावादी समाज रचनेचे मूळ वैदिक ब्राह्मण धर्मात असल्याचे सांगत वैदिक ब्राह्मण धर्माला चांगला पर्याय म्हणून विश्वगुरू बसवण्णा यांनी लिंगायत धर्माची स्थापना करून दिला असे हि सांगितले. तर २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक धर्माची स्थापना केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आक्टोंबर १९५६ या दिवशी नागपूरच्या दिक्षा भूमीवर बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. आज ओबीसी, एस्सी. एस.टी.अल्पसंख्याक यांचे सामाजिक शोषण थांबविण्यासाठी बुद्ध, बसवण्णा, फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारावर वाटचाल केली पाहिजे. वाघमोडे सर पुढे म्हणाले की जत तालुका ओबीसी संघटनेचे माध्यमातून तुकाराम माळी सर आणि रविंद्र सोलनकर यांनी आपल्या सहकार्याना सोबत घेवून विविध उपक्रम राबवून ओबीसी, एस्सी. एस्. टी. अल्पसंख्याक वर्गाला गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी जे कार्य सुरू केले आहे त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. त्यानी  हेच कार्य असेच सुरू ठेवले तर जत तालुक्यातील बहुजन समाज बांधव आपल्या पायावर सर्व क्षेत्रात उभे राहतील.         यावेळी तुकाराम माळी, मुबारक नदाफ, रवींद्र सोलनकर,हाजीसाहेब हुजरे,आनंदराव पांढरे, श्रीकांत माळी,रमेश ऊर्फ चिकू माळी, युवक नेते सुरज माळी, शिवानंद आरळी, इब्राहिम नदाफ,अर्जुन कुकडे सरवेस माळी, विजय ऊर्फ बाळासाहेब माळी, ज्ञानेश्वर ऊर्फ रमेश माळी, महेश साबळे,श्रीमती श्रद्धा सनमडीकर,मेजर भैराप्पा माळी,विनोद माळी, प्रकाश माळी ,दत्तात्रय माळी, सौ.वाघमोडे वहिणी, कदरे सर आदी मान्यवर उपस्थित होते. आभार हाजीसाहेब चंद्रसेन यांनी माणले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन