सोशल मीडिया हे आधुनिक अर्थार्जनाचे साधन: प्रसिद्ध युट्युबर अनिल बन्ने. जतेत ई- कॉमर्स व सोशल मीडिया व्यवसाय यावर व्याख्यानाचे आयोजन.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- सोशल मीडिया हे फक्त मनोरंजनाचे साधन नसून ते अर्थाजनाचे पर्यायाने पैसे कमविण्याचे एक उत्तम साधन असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध युट्युबर व पत्रकार अनिल बन्ने यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे माजी विद्यार्थी संघटना, अर्थशास्त्र, वाणिज्य विभाग, विद्यार्थी विकास मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक आठवडा चालणाऱ्या उद्योजकता विकास या विषयावर आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या सहाव्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ.अशोक बोगुलवार तर समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून अँड. राजकुमार म्हमाने उपस्थित होते.
       अधिक बोलताना ते म्हणाले, माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात अनेक दृक व श्राव्य घटना व माहितीची गरज लक्षात घेता सोशल मीडियाशिवाय पर्याय नाही. अशी माहिती पुरवून युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम, शेअरचाँट त्याचबरोबर इतर सोशल मीडियातुन लाखो रुपयाचे अर्थार्जन होते. पर्यायाने माहिती पुरवून पैसे मिळतात. गावाकडची टेस्ट व संचित टीव्ही न्यूजच्या माध्यमातून मीही सोशल मीडियावर लाखो फॉलोवरसह सक्रिय आहे. अँड. राजकुमार म्हमाने म्हणाले, राजे रामराव महाविद्यालयाने उद्योजकता विकास कार्यशाळा आयोजित करून महाविद्यालयाचा विद्यार्थी भावी उद्योजक कसा बनेल याचा प्रयत्न केला आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बोगुलवार म्हणाले, स्टार्टअप, दुग्ध व्यवसाय, वित्तीय व्यवस्थापन, शेती व ई-कॉमर्स अशा विषयावर कार्यशाळेत आमच्या विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. आजचे पाहुणे हे समाज माध्यमावर काम करून अतिशय चांगल्या पद्धतीने अर्थार्जण करतात. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन भविष्यात उद्योजक बनावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी  केले.
      सहाव्या दिवसाच्या कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्रा. तुकाराम सन्नके यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सतीशकुमार पडोळकर तर प्रा. नारायन सकटे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी डॉ. शकंर गावडे, प्रा. दादासाहेब रणदिवे, प्रा.सोनाली पटेकर, प्रा.किरण साळे व शुभम रुपनावर याचबरोबर वाणिज्य व अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन