शेतीपूरक उद्योगांना भविष्यात संधी:-सदाशिव जाधव. राजे रामराव महाविद्यालयात शेती व्यवसाय सद्यस्थिती व भवितव्य यावर व्याख्यान.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- दि.3 केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेमधून अनुदान घेऊन भविष्यात शेतीपूरक व्यवसायात प्रगती करता येईल. शेतीपूरक उद्योगांना भविष्यात खूप संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन ज्योतिर्लिंग फर्टीलायझर आणि केमिकल कंपनी व जेएफसी ॲग्रोटेकचे प्रोप्रायटर सदाशिव जाधव यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे माजी विद्यार्थी संघटना, अर्थशास्त्र, वाणिज्य विभाग, विद्यार्थी विकास मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक आठवडा चालणाऱ्या उद्योजकता विकास या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या पाचव्या दिवशी प्रमुख साधन व्यक्ती म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.सुरेश पाटील उपस्थित होते. 
      अधिक बोलताना जाधव म्हणाले, उद्योग व्यवसायामध्ये मराठी टक्का कमी असून याची प्रमुख कारणे म्हणजे धाडसी वृत्ती नसणे, सातत्याने कार्यरत न रहाणे व वित्तीय कमतरता असून यावर मार्ग काढून मराठी नवउद्योजकांनी उद्योग क्षेत्रामध्ये यावे. वीस वर्षांपूर्वी ज्यावेळी मी उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल टाकले. त्यावेळी माझ्याकडे अत्यंत तोकडे भागभांडवल होते. मात्र जिद्द, चिकाटी, परिश्रम व सातत्य या जोरावर आज करोडो रुपयाची उलाढाल क्षमता निर्माण झाली आहे. महाविद्यालयाच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भविष्यात उद्योग व्यवसायामध्ये येण्याचा प्रयत्न करावा, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले.
       आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य म्हणाले, आजच्या तरुणांनी न लाजता छोटे- मोठे उद्योग उभारावेत. कष्ट, परिश्रम व चिकाटी या जोरावर भविष्यामध्ये मोठे उद्योगपती होण्यापर्यंत प्रवास शक्य आहे. कोणतेही काम छोटे वा मोठे नसते. तरुणांनी धाडसी वृत्तीने जर एखादे काम केल्यास ते निश्चितच भविष्यामध्ये यशस्वी होतील. 
        पाचव्या दिवसाच्या कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्रा. तुकाराम सन्नके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अतुल टीके तर प्रा. दादासाहेब रणदिवे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी प्रा.सोनाली पटेकर, प्रा.किरण साळे, विक्रम कांबळे, पत्रकार अनिल बन्ने याचबरोबर वाणिज्य व अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन