आर पी आयचे शहर अध्यक्षपदी ईश्वर संकपाळ याची निवड जिल्हा अध्यक्ष संजयरावजी कांबळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र.
दिव्यराज न्युज नेटवर्क :- (राजू ऐवळे) आर पी आयचे जिल्हा अध्यक्ष संजयरावजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जत शहर अध्यक्षपदी धडाडीचे नेतृत्व मा ईश्वर संकपाळ यांची निवड करण्यात आली. यावेळी जत तालुका अध्यक्ष संजयराव कांबळे-पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विकास काका साबळे, उपाध्यक्ष चौगुले सर, जत तालुका विघ्यार्थी अध्यक्ष सुभाष कांबळे, उमराणीचे नेते माहावीर मड्डीमणी, कैलास आदाटे व आर पी आरचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आर पी आर जतच्या वतीने पत्रकारदिना निमित्त जत तालुक्यातील सर्व पत्रकारांचे सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना संजयराव कांबळे म्हणाले की पत्रकार हे लोकशाहीचे चौथा स्तंभ आहे. पत्रकारांचे सत्कार करणे हे आमचे कर्तव्य आहे कारण त्याच्यामुळेच आपणास व सर्व लोकांना जगात काय चालले आहे याची माहीत मिळते. पत्रकारांचे सन्मान करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.
Comments
Post a Comment