मिनी ऑलम्पिकमध्ये राजे रामराव महाविद्यालयाची खेळाडु प्रांजल सावंतची चमकदार कामगिरी.
दिव्यराज न्युज जत :- दि. 13. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी बालेवाडी , पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मिनी ऑलम्पिक कुस्ती स्पर्धेत राजे रामराव महाविद्यालयामध्ये बी. कॉम भाग एकमध्ये शिकणारी कु. प्रांजल पांडुरंग सावंत हिने कांस्यपदक पटकावत चमकदार कामगिरी केली. वेग, चपळता, बुद्धी व शारीरिक परिश्रमाचा कस लागणारा कुस्तीसारखा खेळप्रकार आता मुलीही खेळू लागल्या आहेत. यामध्ये जतसारख्या दुष्काळी व अवर्षणग्रस्त तालुक्यामधील खेळाडू चमकत आपले अधिराज्य गाजवत आहेत, ही तालुक्यासाठी कौतुकस्पद गोष्ट आहे.
या प्रतिभावंत कुस्ती खेळाडूला श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे प्रशासन सचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, अर्थसचिव सीताराम गवळी, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील, उपप्राचार्य प्रा. सिद्राम चव्हाण, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनुप मुळे व प्रा. दीपक कांबळे, प्रांजलचे वडील पांडुरंग सावंत, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या यशप्राप्त खेळाडूचे जत व जत पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment