प्रा. सिद्राम चव्हाण यांचे कार्य दिपस्तंभा सारखे मार्गदर्शक:- प्रा. पद्माकर जगदाळे

दिव्यराज न्युज जत प्रतिनिधी :- प्रा. सिद्राम चव्हाण यांनी  विद्यार्थी आणि खेळाडू यांच्या सर्वांगिण विकासात महत्वपूर्ण योगदान दिले असून त्यांचे कार्य हे सदैव दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल असे गौरवोद्गार प्रा. पद्माकर जगदाळे यांनी काढले. ते राजे रामराव महाविद्यालय,जत येथील शारीरिक शिक्षण विभागाचे विभागप्रमुख प्रा. सिद्राम चव्हाण यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सेवा गौरव समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले कि महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर ॲथलेटिक स्पर्धा आयोजनात व त्या यशस्वीपणे पार पाडण्यात चव्हाण सरांचा हातखंडा होता. अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीबरोबर मानसिक आधार देऊन घडवले. त्यांनी आपल्या कार्यातून विद्यापीठ स्तरावर दबदबा निर्माण केला होता. त्यांचे कार्य सदैव दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल असे गौरवोद्गार काढून भावी वाटचालीसाठी व आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. सिद्राम चव्हाण यांचा सपत्नीक ह्दय सत्कार करण्यात आला. 
सदर कार्यक्रमास सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील शारिरीक शिक्षण संचालक व अधिव्याख्याते प्रा. प्रदीप चव्हाण, प्रा. जे. एन. तांबोळी, प्रा. रामा पाटील, प्रा. एच. ए. पाचोरे, प्रा. संजय पाटील, प्रा.आकाश बनसोडे, प्रा. सुधीर वाटवे, प्रा. प्रकाश कावले, प्रा. सुरेश धुरे, प्रा. महेश पाटील, प्रा. अजित पाटील, प्रा. बापू  गणेश, प्रा. वासुदेव पाटील , प्रा. गणेश सिंहासने , प्रा. संध्या पाटील, प्रा. सविता भोसले, प्रा. श्रीदेवी हिरगुडे, प्रा. प्रिया टिळे इ. उपस्थित होते. 
यावेळी उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक प्रा. एन. डी. बनसोडे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. रूपाली कांबळे तर आभार प्रा. कांचन बेल्लद यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन