प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा जन्मदिवस ज्ञानशिदोरी दिन म्हणून साजरा, श्रीमंत विजयसिंहराजे डफळे ग्रंथालयात कार्यक्रमाचे आयोजन.

दिव्यराज न्युज जत प्रतिनिधी :- दि. 18. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या श्रीमंत विजयसिंहराजे डफळे ग्रंथालय व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा जन्मदिवस ज्ञानशिदोरी दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 
         प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा जन्मदिन परंपरेने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सर्व शैक्षणिक शाखांमध्ये विविध उपक्रमांनी साजरा होतो. यामध्ये ग्रंथ प्रदर्शन, पुस्तकाचे प्रकट वाचन, पुस्तक भेट देणे इत्यादी उपक्रमांचा समावेश असतो. यानिमित्ताने ग्रंथालयात विविध पुस्तकांचे व संदर्भ ग्रंथाचे प्रदर्शन भरवण्यात आले. वाचन संस्कृती वाढावी यासाठी विद्यार्थ्यांना प्रा.डॉ. निर्मला मोरे यांनी पुस्तके भेट दिली. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सुरेश पाटील व उपप्राचार्य प्रा. सिद्राम चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना प्राचार्य म्हणाले, समाज माध्यमाच्या या जगात वाचन संस्कृती लोप पावत चालली असताना महाविद्यालयाच्या ग्रंथालयामार्फत अभयकुमार साळुंखे साहेब यांचा वाढदिवस ज्ञानाची शिदोरी म्हणून साजरा केला जातो, हे खूपच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालावी.
         या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, उपप्राचार्य प्रा. सिद्राम चव्हाण, ग्रंथपाल प्रा.अभयकुमार पाटील, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन