राजकारण विरहित समाजकार्य सुरूच ठेवणार- तुकाराम बाबा, जत तालुक्यातील ९२ पत्रकारांचा सत्कार.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- चांगले काम करताना टिका, टिप्पणी होतच असते त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत जतमधील सर्वसामान्य जनतेसाठी, जतच्या पाण्यासाठी आपला लढा हा सुरूच राहणार आहे. राजकारण विरहित समाजकार्याचा ध्यास घेवून आपण श्री संत गाडगेबाबांचे शिष्य,  श्री संत बागडेबाबा यांच्या समाजकार्याचा वारसा जपत राजकारण विरहित समाजकार्य सुरूच ठेवणार असल्याचे प्रतिपादन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
    पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समिती व बाबा आश्रम यांच्या वतीने तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुक्यातील विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, पत्रकार बांधव तसेच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीत ज्या पत्रकारांनी सदस्य व सरपंचपदी निवड झाली त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संखचे अप्पर तहसिलदार सुधाकर मागाडे आदी उपस्थित होते. यावेळी संतोष टेळेकर, दत्ता सावळे, संभाजी नलवडे उपस्थित होते.
   यावेळी पत्रकार संघटनेचे , मनोहर पवार, अमोल कुलकर्णी, मारुती मदने, राहुल संकपाळ, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे  म्हणून बोलताना अप्पर तहसिलदार सुधाकर मागाडे यांनी जतच्या विकासात पत्रकारांचा वाटा मोठा असल्याचे सांगितले.
   अध्यक्षीय समारोपात बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले, दुष्काळी जत तालुक्यात काम करताना पत्रकारांच्या माध्यमातून समाजातील दुःख, वेदना समजल्या. दुष्काळ, महापूर, कोरोना, अपघात, जळीत घटना समजतात. यावेळी आपण मानवतेच्या भावनेतून मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून समाजकार्य हाती घेतले. समाजातील शेवटच्या घटकापर्यत निस्वार्थपणे मदत पोहचली पाहिजे, समाजामध्ये दानशूरपणा वाढला पाहीजे,  समाजात जनजागृती व मदतीची भावना निर्माण झाली पाहिजे याच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण समाजकार्य केले व पुढेही भविष्यात करणार. 
  जत तालुक्यातील पत्रकारांची वाढती संख्या ही चिंतेचा विषय नव्हे तर या क्षेत्रात वाढत चाललेली विश्वासहर्ता आहे. याच विश्वासहर्तेमुळे आजची नवीन पिढी पत्रकार क्षेत्राकडे वळली आहे . दुष्काळी भागात अनंत संकटावर मात करत जतच्या पत्रकारितेने आपली वाटचाल सूरु ठेवली आहे. जतच्या पत्रकारांना सदैव सहकार्य करू अशी ग्वाही तुकाराम बाबा यांनी दिली.
■ विरोधकांच्या टिकेला बाबांचे उत्तर
जतच्या पाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. पाऊण तास झालेल्या चर्चेत आपण मुख्यमंत्र्यांना जतच्या आठ तलावात कमी खर्चात, म्हैसाळ योजनेतून पाणी येवू शकते हे नकाशासह सांगितले तसेच विस्तारित योजना व जतच्या प्रलंबित विषयाबाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांची घेतलेली ही भेटच अनेकांना खुपत आहे. पाण्यावरून यापूढे राजकारण चालणार नाही, स्वतःची पोळी भाजणार नाही हे लक्षात आल्याने काही राजकीय मंडळींनी तुकाराम बाबांचे योगदान काय असा सवाल उपस्थित करत आपणावर केलेल्या टिकेची बाबांनी खरपूरस समाचार घेतला. तुकाराम बाबा ज्यावेळी दुष्काळ, कोरोनात, नैसर्गिक आपत्तीत जतकरांना मदत केली त्यावेळी तुकाराम बाबा चांगले होते पण आता पाण्याचा मुद्दा संपणार म्हटले की माझ्यावर टिका केली जाते हे योग्य नाही. जतसाठी मी काम करतो राजकारणासाठी नाही हेही बाबांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन