मेंढेगिरीमध्ये आमदार जयंत पाटील यांचे स्विय साहाय्यक मा अमोल डफळे यांचे वाढदिवसा निमित्त सत्कार.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- (राजू ऐवळे) उमराणी गावचे सुपुत्र व माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचे स्विय साहायक माननीय अमोल दादा डफळे यांचा आज वाढदिवसा निमित्त मेंढेगिरी सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा फळ मार्केट कमिटीचे माजी सभापती रमेश बिराजदार,विद्यमान चेअरमन रावसाहेब कांबळे, व्हा-चेअरमन मलकप्पा बिरादार, माजी चेअरमन कुमार जैन, सेक्रेटरी - मुरग्याप्पा हिप्परगी ,ग्रामपंचायत मेंढेगिरीचे माजी उपसरपंच चिक्कापा केंगार, सोसायटी संचालक - गजानन बिराजदार , मेंढीगिरीचे नेते - रवी पाटील , विजय बिराजदार सर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डफळे म्हणाले की मेंढेगिरी सोसायटीला सर्व प्रकारचे मदत करेन.
Comments
Post a Comment