कु.प्रज्ञा काटे ज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- सामाजिक व शैक्षणिक कार्यात सहभागी होत विविध विषयांवर लोकप्रबोधन करण्याचे मोलाचे कार्य केल्याबद्दल सीबीएस न्यूज मराठीच्या वतीने प्रसिद्ध व्याख्याते आणि कवी अविनाश भारती यांच्याहस्ते जत येथील प्रज्ञा बाबासाहेब काटे हिचा राज्यस्तरीय ज्ञानरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यामुळे जत व सांगोला तालुक्यातुन तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
     सिबीएस न्यूज मराठीच्या
चौथा वर्धापनदिन सोहळा २०२३ च्या निमित्त कु. प्रज्ञा बाबासाहेब काटे (जत) हिला राज्यस्तरीय ज्ञानरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रज्ञा काटे हिने सामाजिक बांधिलकी जपत  विविध कार्यक्रमात जनजागृतीपर लोकांचे प्रबोधन केले आहे. तसेच आपल्या कार्याद्वारे गावाचा आणि तालुक्याच्या विकास आणि प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. समाजाचे भूषण नागरिक म्हणून  आपला सन्मान करीत असल्याचे
 सी.बी.एस न्युज मराठी व डिजीटल नेटवर्क महाराष्ट्र यांच्या पत्रात म्हंटले आहे.
   प्रज्ञा काटे हिला यापूर्वी ग्लोबल अविष्कार फाऊंडेशन, नांदेड यांच्यावतीनेही पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. मूळचे जाडरबोबलाद येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते  आणि स्टॅम्पव्हेंडर असलेले बाबासाहेब काटे यांची प्रज्ञा ही कन्या असून आतापर्यंत प्रज्ञा काटे हिने अनेक सामाजिक व शैक्षणिक विषयावर  वक्तृत्व स्पर्धा व तालुक्यातील विविध आयोजित कार्यक्रमात सहभाग घेत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रबोधन करण्याचे काम केले आहे. ती बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून तिला सामाजिक कार्याचीही प्रचंड आवड आहे. या सत्काराच्या निमित्ताने तिचे जत व सांगोला तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात  890 प्रस्ताव मधून प्रज्ञा काटेची ज्ञानरत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
     सीबीएस न्युज मराठी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यास
 प्रसिद्ध कवी आणि व्याख्याते अविनाश भारती सिबीएस न्यूजचे संपादक
चाँदभैय्या शेख,उपसंपादक
राजाभाऊ गुजले, वडील बाबासाहेब काटे, आई छाया काटे  यांच्यासह इतर पुरस्कार प्राप्त मानकरी आणि मान्यवर  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन