मेढेंगिरी येथील जि.प मराठी शाळा खोल्या मंजुर करा,- लवकरच दोन्ही योजनेला मंजुरी देऊ- योगेश जानकर यांचा आश्वासन.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत
:- मेढेंगिरी येथील जि.प मराठी शाळा खोल्या मंजुरी व मेंढेगिरी ते खोजनवाडी जुना उमराणी रस्ता डाबरीकरण हे दोन्ही कामे तातडीने करा अशा निवेदन मेंढेगिरी सोसायटीचे माजी चेअरमन कुमार जैन व युवा नेते सुरेश पाटील यांनी बाळासाहेबांची शिवसेना जतचे संपर्क प्रमुख मा. योगेशजी जानकर यांना देले. प्रथमच योगेश जानकर यांची भेट घेऊन मेंढेगिरी सोसायटी, ग्रामपंचायत व ग्रामंस्था तर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारा प्रसंगी बोलतना जानकर म्हणाले की मराठी शाळा खोल्या व जुना उमराणी रस्तासाठी तातडीने मंजुरी देऊ यासाठी मी पुढाकार घेऊन मा मुख्यमंत्री साहेबानां भेटून मंजुरी आणन्याचे आश्वासन योगेश जानकर यांनी दिली.
Comments
Post a Comment