उमदी ता.जत येथे शिवजयंती निमित्त ग्रामपंचायत व अन्नपुर्णा फाऊंडेशन यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत:- (राजू ऐवळे) शिवाजी महाराज हे मोठे थोर पुरुष होते. त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचले पाहीजेत. युवक वर्गानी शिवाजी महाराज यांचा आदर्श घेत व्यसनापासून दूर रहावे असे आवाहन युवा नेते संजय तेली यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी सरपंच मुत्तू आण्णा तेली, माजी उपसरपंच निसारभाई मुल्ला, सिद्राय्या तळ्ळी, उपसरपंच अशोक माशाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय तेली यांनी शिवजयंती निमित्त उमदी येथे लवकरच शिवाजी पार्क निर्माण करु अशी ग्वाही शिवभक्तांना दिली. यावेळी बोलताना ज्योती नागणे यांनी शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगत आजच्या तरुणांनी एकत्र येत विकासाचे व्हिजन राबवावे व आपल्या गावचे नाव देशाच्या नकाशात स्वाभीमानाने कोरावे असा शिवाजी महाराजांचा आदर्श घेत काम करावे असे आवाहन केले.
उमदी ता.जत येथे ग्रामपंचायत यांच्या वतीने शिवजयंती निमित्त स्वच्छत मोहीम राबवून ग्रामपंचायत व अन्नपूर्णा फाउंडेशन यांच्यावतीने वृक्षारोपण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. तसेच उमदी ग्रामपंचायत यांच्या वतीने शिवाजी पार्क चे पुजन ही करण्यात आले. अन्नपूर्णा फाउंडेशन चे अध्यक्ष राजकुमार आवटी यांचा सत्कार ग्रामपंचायत यांच्या वतीने सरपंच मुत्तू आण्णा तेली यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच चंद्रकांत नागणे, तंटामुक्ती अध्यक्ष बंडा पवार, उपाध्यक्ष राजु स्वामी, राजु चव्हाण सर, हणमंत कोकळे, तालुका उपाध्यक्ष रवी शिवपुरे, सरचिटणीस मलु सालुटगी, ग्रामपंचायत सदस्य फिरोज मुल्ला, मलकु बाबर, संजय यरकर, महादेव पुजारी, डॉ.राहुल पाटील, डॉ.म्हैत्रे, महेश चव्हाण, दिपक शिमगे, सिद्धु पुजारी, रमेश माळी, संगम ममदापुरे, आनंद कोकळे, मधु माळी, चिदानंद रगटे, मलु बनगोंड, उदय चव्हाण, राहुल कोकळे, रोहन चव्हाण, विलास तळ्ळी सह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष कोकळे यांनी केले तर आभार दिनेश शिमगे यांनी मानले.
Comments
Post a Comment