अकरा सेवा सोसायटीचा कारभार जिल्हा बँकेच्या एकाच फिल्ड ऑफिसरकडे , स्वतंत्र फिल्ड ऑफिसर नेमण्याची विक्रम ढोणे यांची मागणी.

दिव्यराज मराठी न्युज जत :-(राजू ऐवळे)  सांगली जिल्ह्य मध्यवर्ती बँकेच्या जील्हातील इतर फिल्ड ऑफिसरकडे जास्तीत जास्त 5 ते 6 सोसायटीचा कारभार असताना डफळापुर आणि बाज सोसायटीच्या फिल्ड ऑफिसरकडे मात्र 11 सोसायटीचा कारभार आहे. त्यामुळे शेतकरी सभासदांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असल्याने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जत तालुक्यातील डफळापुर व बाज शाखेस स्वतंत्र फिल्ड ऑफिसर नेमण्याची मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाकडे केली आहे.
   जत तालुक्यातील पश्चिम भागात म्हैशाळ योजनेचे पाणी आल्याने बागायती क्षेत्र वाढले आहे त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी सभासद मोठ्या प्रमाणात शेती कर्ज, पीक कर्ज,  मध्यम मुदत,दीर्घ मुदत कर्ज घेण्यासाठी सेवा सोसायटी यांच्याकडे अर्ज करत आहेत पण एकाच फिल्ड ऑफिसरकडे ११ सोसायटीचा कारभार असल्याने प्रत्येक सोसायटीकडे लक्ष देता येत नसल्याने त्यांना वेळेवर कर्जपुरवठा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. फिल्ड ऑफिसर असून अडचण नसून खोळंबा अशी सोसायट्यांची अवस्था झाली आहे.
  पश्चिम भागात एकूण ११ सोसायटी असून डफळापुर शाखा अंतर्गत ६ सोसायटी डफळापुर 2, शिंगणापूर, मिरवाड, जिराग्याळ, ऐकुंडी आणि बाज शाखा अंतर्गत ५ सोसायटी बाज गावातील 2 सोसायटी, अंकले, डोर्ली, बेलुंखी आदी सोसायट्या आहेत. डफळापुर आणि बाज शाखेसाठी एकच फिल्ड ऑफिसर असल्याने शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास विलंब होत आहे त्यामुळे शेतकरी सभासदांच्या आणि बँकेच्या सोयीसाठी तातडीने जत तालुक्यातील डफळापुर आणि बाज शाखेसाठी स्वतंत्र फिल्ड ऑफिसर नेमून जत तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांची सोय करावी अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी बँकेच्या प्रशासनाशी व संचालक मंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन