जत मधील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत प्रतिनिधी :- संपूर्ण महाराष्ट्रात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याआंदोलनास जत तालुका वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पाठिंबा दिला. राज्यभर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे राज्यभर आंदोलन दि. 20 फेब्रुवारी 2023 सुरू झाले असून यांची मानधन ऐवजी सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे दर्जा वेतन व निवृत्तीनंतर पेन्शन मिळावी या मागणीकरता आंदोलन सुरू केली आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेशाचे पालन न करता साडेआठ हजार सेविकेस मानधन व मदतनीस करता चार हजार दोनशे मानधन दिले जात आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश बारा हजार रुपये मानधन द्यावे असे असताना देखील या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन वाढविण्यात आलेले नसून याकरिता काम बंद आंदोलन छेडले असून बेमुदत संपास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आले आहे.
Comments
Post a Comment