जत तालुक्यातील प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन : विक्रम ढोणे.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत:- जत तालुका विकासाच्या प्रक्रियेत राज्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत मागास असून जत तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मुख्य प्रश्नांची तातडीने सोडवणूक करणे गरजेचे आहे.तालुक्याच्या या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिवेशनाच्या पाश्वभूमीवर जत तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करीत असल्याचे युवा नेते विक्रम ढोणे यांनी सांगितले.
  जत तालुक्याचे तातडीने विभाजन करावे, तोपर्यंत संख येथील अप्पर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे निर्माण करावीत. तसेच सर्व सोयींनी सुसज्ज अशी संख येथे प्रशासकीय इमारत करावी.
संख येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी.जत शहरात स्वतंत्र वाहतूक विभाग सुरू करावा.जत तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची रिक्त पदे प्राधान्याने तातडीने भरावीत.जत तालुक्यातील  मागणी नसलेल्या गावांवर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची जबरदस्तीने अंमलबजावणी करण्यात येऊ नये.मागील सरकारच्या कालावधीतील जत शहरासह तालुक्यातील मंजूर विकास कामावर आणलेली स्थगिती उठवावी.म्हैसाळ योजनेतून पूर्व भागातील गावासाठी लाभधारक असणारी उर्वरित निविदा प्रक्रिया राबवावी.म्हैसाळ पंप गृह विभाग क्रमांक २ हे कार्यालय जत येथे स्थलांतरित करावे,पी एम किसान योजना,सातबारा उतारा दुरुस्ती शिबिर, जत शहरातील प्रमुख रस्ता छत्रपती संभाजी महाराज चौक ते नगरपालिकेचे पाण्याच्या टाकीवरील कार्यालय  या रस्ताची दुरुस्ती नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या यासह इतर मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी जत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन घंटानाद आंदोलन करणार असल्याची माहिती युवा नेते विक्रम ढोणे यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन