संत निरंकारी मिशनमार्फत अमृत परियोजने अंतर्गत‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- संत निरंकारी मिशनमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात रविवार, दिनांक 26 फेब्रुवारी, 2023 रोजी ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 
‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये जलाशयांची स्वच्छता आणि स्थानिक जनतेमध्ये जागृती अभियान राबवून जनसामान्यांना प्रोत्साहित करणे हा या परियोजनेचा केंद्रबिंदू आहे.  
बाबा हरदेवसिंहजी यांनी आपल्या कार्यकालात समाज कल्याणाचे  अनेक उपक्रम राबवले. त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान यांची सुरवात प्रमुख आहेत. त्यांच्याच शिकवणूकीतून प्रेरणा घेत दरवर्षी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यावर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात येत आहे.  
 ही परियोजना संपूर्ण भारतभरात 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 730 शहरांमध्ये जवळपास 1100 ठिकाणी राबविण्यात येणार आहे. या परियोजनेअंतर्गत निरंकारी मिशनचे सुमारे 1.5 लाख स्वयंसेवक विस्तृत रूपाने आपापल्या स्थानिक ठिकाणी सेवा देणार आहेत                                       सांगली जिल्हामध्ये सांगली खानापूर शिराळा सेक्टर अंतर्गत प्रत्येक शाखेमध्ये 
हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन