जतेतील राजे रामराव महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बारावी व विद्यापीठ परीक्षेवर बहिष्कार,विद्यार्थी व सुठा संघटनेचा पाठींबा.
दिव्यराज मराठी न्युज जत प्रतिनिधी :-बारावीच्या बोर्ड परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत तसेच विद्यापीठ परीक्षेवर जतेतील राजे रामराव महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बारावी व विद्यापीठ परीक्षेवर बहिष्कार पुकारला आहे. या बहिष्काराला विद्यार्थी व सुठा संघटनेने पाठींबा दिला आहे. कर्मचारीच नसल्याने कॉलेज बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. आश्वासित प्रगती योजना, 58 महिन्याची थकबाकी, 1410 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या सर्व मागण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बहिष्कार पुकारलेला आहे.
या बहिष्कारास कार्यालयीन अधीक्षक मनोहर मोरे,शिवराम मोईन,संजय राजमाने,बिराप्पा पुजारी,रामा शिंदे,राजू माळी,रियाज गंजीवाले,गजानन कुंभार,अमोल डफळे, उमेश सावंत,धनाजी हिप्परकर,तुकाराम शिंगाडे,आबा शिरगिरे,राजू ईमडे, अधिक घुंगरे,गोरख हेगडे,बापू सावंत, गजानन कुंभार,श्रीशल बिराजदार, झाकीरहुसेन मुलाणी,अक्षय वाघमोडे व बिरुदेव सदाकळे आदी शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते
शासनाने मागण्यांबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा प्रभारी प्राचार्य प्रा.(डॉ.)सुरेश एस.पाटील यांनी व्यक्त केली. या आंदोलनाला महाविद्यालयातील स्टाफ सेक्रेटरी व प्राध्यापकांनी पाठिंबा दर्शविला. -या आहेत प्रमुख मागण्या-
■ प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवित करुन पूर्ववत लागू करा.
■ सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०.२०.३० वर्षानंतरच्या लाभाची योजना लागू करा.
■ वंचित असलेल्या १,४१० कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग करुन फरकाची थकबाकी अदा करा.
■ विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या.
■ २००५ नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा.
Comments
Post a Comment