राहुल गांधी यांच्यावार खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल जत चे लोकप्रिय आमदार मा.विक्रम (दादा) सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- काँग्रेस नेते मा. राहुल गांधीं याच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करुन हुकूमशहा मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. या विरुद्धची काँग्रेसची लढाई आता थांबणार नाही. उलट जेवढे हल्ले होतील तेवढी जास्त काँग्रेस अधिक सक्षम होणार आहे. काँग्रेसच्या विचारातच संघर्ष आहे. या करीता आज निषेध आंदोलन जत चे लोकप्रिय आमदार मा.विक्रम (दादा) सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराया बिरादार ,पंचायत समिती जत चे माजी सभापती बाबासाहेब कोडग,सांगली जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील , जालिंदर व्हनमाने,अशोक बन्नेनवर,परशुराम मोरे, महादेव कोळी,दिनेश जाधव ,रावसाहेब मंगसुळी,युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आकाश बनसोडे, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष तुकाराम माळी सर,शिवानंद तंगडी, आदी सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment