डफळापुर येथील तलाठी व मंडल अधिकारी यांच्यावार कारवाई करा- प्रहारचे सुनिल बागडे यांचा प्रांताधिकारी यांना निवेद.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :-  जत तालुक्यातील डफळापुर येथील तत्कालीन तलाठी अलका भोसले व मंडळ अधिकारी सलीम मुलाणी यांचे वर सेवा हमी कायदा २०१५ नुसार कारवाई करावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल बागडे यांनी निवेदनाव्दारे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्याकडं केली आहे.
      जत तहसिलदार जत यांनी दि.१० जून २०१९ रोजी आदेश क्र. ९४०/२०१९  नुसार सर्कल सिकंदर घुडूलाल भालदार यांनी यांचे फाळणी १२ ची नोंद घालनेसाठी आदेश दिला आहे. ही नोंद घालणे व हित्त संबधितांना नोटीसा देणे व पोच घेणे व नोंद घालणे याचा कालावधी नियमानुसार सदर २१ असताना ४ महिन्यानंतर फेरफार १२५९० ची नोंद घातली आहे.
मंडळ अधिकार यांनी आलेल्या तक्रारी अर्जाची दखल न घेता ४ महिन्यानंतर फिफो प्रणाली नुसार फेरफार १२५९० नामंजूर केला आहे. सदर प्रकरणात तक्रारदार यांनी अप्पर जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी जत यांच्या कडे लेखी तक्रार दिली आहे. तताफी जत तहसिलदार  यांनी अध्याप त्याची दखल घेतली नाही.  तक्रारदार यांनी जत तहसिलदार यांना मंडळ अधिकारी यांच्या साठी २४ पृष्ठे जोडले आहे. तलाठी यांच्या साठी १९ पृष्ठे जोडून खुलासा केलेला आहे. अध्याप त्यांचेवर कोणतीही कारवाई झालेली नाही. व फेरफार १२५९० हा अजून प्रलंबित आहे. सबब तलाठी श्रीमती. भोसले व मंडळ अधिकारी श्री. मुलाणी यांच्यावर निलंबनाची तत्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा मा. उपविभागीय अधिकारी जत या कार्यालय समोर प्रहार संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येईल, असा इशारा बागडे यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन