उपेक्षितांना न्याय देण्याचे काम परशुराम मोरेंनी केले, आमदारनी केले जागर फाऊंडेशनच कौतुक.
दिव्यराज न्युज जत :- गोरगरीब वंचित व उपेक्षित लोकांना न्याय देण्याचे काम जागर फौंडेशनच्या माध्यमातून माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे यांनी केले आहे. त्यांची ही सामाजिक बांधिलकी जत शहरातील जनता विसरणार नाही, असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले. येथील बचत भवन येथे जागर फौंडेशनच्या वतीने "आयुष्मान भारत कार्ड" अभियानाच्या उदघाटन प्रसंगी आमदार सावंत बोलत होते.
आमदार सावंत म्हणाले, माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे यांनी जागर फौंडेशनची स्थापना करून शहरात सामाजिक बांधीलकी जपली आहे. या फौंडेशनचे सर्व सदस्य शहरातील गोरगरीब, वंचित व उपेक्षित नागरिकांसाठी विविध योजना राबवित आहेत. शहरात स्वच्छता मोहीमेतून परशुराम मोरे यांचे नाव घराघरात पोहोचले आहे. कोरोना काळात जागर फौंडेशनचे काम हे कधीही विसरता येण्यासारखे नाही.शासकीय योजना सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहचविण्याचे काम परशुराम मोरे यांनी केले आहे. रेशनकार्ड असो घरकुल, संजयगांधी निराधार योजना, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून शौचालय अशा शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना देण्याचे काम जागर फौंडेशनने केले आहे. स्व. भिमराव मोरे यांनीही गोरगरिबांसाठी योगदान दिले. त्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम परशुराम करीत आहेत. याचा अभिमान वाटतो. आयुष्मान भारत योजनेचे आतापर्यंत 4 हजारहून अधिक लाभार्थ्यांना फायदा झाला आहे. शहरातील प्रत्येक घटकाला याचा लाभ मिळेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार आहे.
केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजना आयुष्मान भारत योजना गरजू व गोर गरीब जनतेच्या हिताची आहे. त्याचा लाभ नागरिकांना व्हावा यासाठी परशुराम मोरे यांनी अभियान सुरू केले आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा. आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत परशुराम मोरे सामाजिक काम करणाऱ्या तसेच सामान्य जनतेशी नाळ असणाऱ्यांना मदत करण्याचे धोरण शहरातील नागरिकांनी ठेवण्याची गरज आहे.
जागर फॉऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे म्हणाले, सरकारने सुरु केलेल्या योजना गरजू व गोर गरीब जनतेच्या हिताची आहे. त्याचा लाभ जत शहरातील नागरिकांना व्हावा यासाठी जागर फाऊंडेशनची काम करीत आहे. आमच्या कुंटुबाला समाजसेवेचा वारसा आहे. आमचे वडील स्व. भीमराव मोरे यांनी शहरातील गोरगरीब व वंचीत घटकातील समस्या ह्या स्वतःच्या मानून त्या सोडवण्यासाठी काम करीत राहिले. त्यांचे स्वप्न उराशी बाळगून मी काम करीत आहे. माझ्या कामाला शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. यापुढेही उपेक्षित लोकांसाठी मी काम करीत राहणार आहे.
Comments
Post a Comment