महिला दिनी भाजी विक्रत्या महिलांना मिळाली सावली,परशुराम मोरेंचा 'छत्री वाटप' उपक्रम,
दिव्यराज न्युज जत :- उन्हाचे चटके सहन करून भाजीपाला विक्री करणाऱ्या गोरगरीब महिलांना छत्री वाटप महिलांना सावलीचा आधार देण्याचे काम जागर फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांनी केले. महिला दिनाचे औचित्य साधून जागर फौंडेशनच्या वतीने जत शहरात भाजी विक्री करणाऱ्या महिलांना छत्री वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला. पोलीस कर्मचारी विद्या मिरजे यांच्या हस्ते महिला भाजीपाला विक्री करणाऱ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
परशुराम मोरे म्हणाले, जत नगरपालिकेने शहरातील भाजीपाला विक्री करणाऱ्यांना कोणत्याही सोयी सुविधा दिल्या नाहीत. लाखो रुपये खर्चून भाजी मंडई उभी राहिली. त्या ठिकाणी सुवीधाचा अभाव असल्याने व्यापारी बसत नाहीत. त्यामुळे आजही बाजार रस्त्यावर बसतो. जत हे तालुक्याचे ठिकाण आहे. मंगळवारच्या बाजाराच्या दिवसासह दररोज शहरातील महिला भाजी विक्रीसाठी येतातच त्याचबरोबर ग्रामीण भागातील महिलाही मोठ्या प्रमाणात येतात. पण त्यांना रस्त्यावरच भर उन्हात व पावसात बसावे लागते. सद्या उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. भाजी विक्रत्या महिलांना अनेक समस्यांना तोंड ध्यावे लागते याचा विचार करून त्यांना उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी या भाजी विक्रत्या महिलांना छत्रीचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी जागर फौंडेशनचे सर्व सदस्य व नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment