भ्रस्टाचाराविरोधी जन आक्रोश संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी दिपक शिंगे.- महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने सत्कार.

दिव्यराज न्युज जत :- (राजू ऐवळे) भारत सरकारमान्यता प्राप्त भ्रस्टाचाराविरोधी जन  आक्रोश संघटना  सांगली जिल्हा अध्यक्षपदी दिपक शिंगे यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या  वतीने सत्कार करण्यात आला.                                           यावेळी संघटनेचे  जिल्हाधक्ष  दीपक शिंगे, जत तालुका अध्यक्ष -विशाल  शिवशरण, तालुका उपाध्यक्ष-पांडुरंग जगधणे, तालुका साचिव -अजय वाघमोडे, कार्याध्यक्ष -सुधीर बाबर या सर्वाचे शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष-संतोष काटे, जिल्हा कार्याध्यक्ष -दिलीपकुमार हिंदुस्थानी, तालुका अध्यक्ष -सुनील सूर्यवंशी, शिक्षक नेते -पिरपा ऐवळे, डिसिपीएस जिल्हा उपाध्यक्ष -राजकुमार करडी सर आदिनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना शिंगे म्हणाले कि या संघटनेचा उपयोग गरीब जनतेवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी करेने.भ्रष्टाचारमुक्त जिल्हा करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. हे कार्यक्रम डाँ बाबासाहेब आंबेडकर उद्यान जत येथे संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

13 मे हा दिवस संत निरंकारी मिशनच्या वतीने जगभर “समर्पण दिवस” म्हणून साजरा केला जातो.

जत येथील सोहन ठोंबरे यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची पीएच. डी.