शेड्याळ ता. जतच्या सरपंचपदी भगवानदास केंगार यांची निवड.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत:- (राजू ऐवळे) शेड्याळ तालुका जत या गावचे नुतन सरपंच पदी भगवानदास केंगार यांची बिनविरोध निवड करण्यात आली..
व नूतन उपसरपंच पदी उषाताई जाधव यांची निवड करण्यात आली..
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप मोरे यांनी काम पाहिले..
जत तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची एकमेव ग्रामपंचायत आहे या शिवसेनेच्या सत्तेमुळे तालुक्यात सर्व शिवसेना पदाधिकारी मध्ये आनंदाचे वातावरण आहे.. 9 पैकी 6 सदस्य सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मतदान केल्यामुळे भगवानदास केंगार यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली..
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या एक युवा नेतृत्व. शिवसेनेच्या युवा नेत्याला संधी मिळाल्यामुळे सर्व सदस्य. शिवसैनिक. व गावातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ मंडळी यांनी आनंद व्यक्त केला.. व निवडीनंतर फटाक्याची आताशबाजी करण्यात आली..
व यावेळी माजी सरपंच तायव्वा थोरात. व माजी उपसरपंच कार्याप्पा गुगवाड. यांचा सत्कार माजी सरपंच अशोक जाधव. विद्याधर जाधव. उषाताई जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..
Comments
Post a Comment