जतमधे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जनजागृती अभियानराजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा पुढाकार.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- पौष्टिक तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच त्यांचा आहारात वापर वाढविण्याकरीता ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३' साजरे करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्याच्या पुढाकाराने जगभर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे होत असताना त्याला प्रतिसाद म्हणुन राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व प्राध्यापक जत तालुक्यातील गावोगावी जाऊन याविषयी जनजागृती करत आहेत. हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. ते एक मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जनजागृती अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा.पुंडलिक चौधरी, प्रा.तुकाराम सन्नके व डॉ. राजेंद्र लवटे उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जत तालुक्यातील रावळगुंडवाडी, बिळुर, डफळापुर, शेगाव, रामपूर, वळसंग, वज्रवाड, बनाळी व कुंभारी या गावात जाऊन तृणधान्याचे आपल्या जीवनातील महत्त्व, त्याची पौष्टिकता, पोषणमूल्यता व तृणधान्य पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी तसेच त्यांचा आहारात वापर वाढविण्याकरीता शेतकरी व ग्रामस्थांना माहिती देऊन जनजागृती केली. या जनजागृती अभियानामध्ये कार्यक्रमाधिकारी प्रा.पुंडलिक चौधरी, प्रा.तुकाराम सन्नके, डॉ. राजेंद्र लवटे, राष्ट्रीय सेवा योजना समितीतील सदस्य प्रा.अतुल टिके, प्रा. प्रियांका भुसनूर, प्रा.विजय यमगर, प्रा.प्रकाश माळी, प्रा.सोनाली पटेकर, प्रा. किरण साळे डॉ. संगीता देशमुख, प्रा.जयश्री बाळेकाई, प्रा. जयश्री मोटे व डॉ. शंकर सौदागर यांच्यासोबत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक सहभागी झाले.
Comments
Post a Comment