जत तालुका कृषी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य २०२३ पिक स्पर्धा मधील शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा सपंन्न.
दिव्यराज न्युज नेटवर्क :- (राजू ऐवळे) जत तालुका कृषी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन २०२३ पिक स्पर्धा खरीप हंगाम सन २०२२ मधील पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा व खरीप सन २०२३ पूर्व हंगाम प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ आ.विक्रमसिंह सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी प्रथम जत शहरातून बैलगाडीतून ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य असा मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमिस आ.विक्रमसिंह सावंत ,जत तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ, जत तालुका कृषी अधिकारी हणमंत मेडेदार, बागायतदार सुभाष गोब्बी, दत्ता माळी, मल्लिकार्जुन जेऊर, थोरात साहेब व जत कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि मान्यवर नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment