देशाला शांती देण्याचे महान कार्य निरंकारी मंडळ करित आहे- जतचे डि वाय एस पी साळुखे, निरंकारी मिशनच्या वतीने 126 जणांनी केले रक्तदान.

दिव्यराज न्युज नेटवर्क :- (राजू ऐवळे)संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा जत संत निरंकारी चॅरिटेबल फौडेंशनच्या वतीने बचत भवन जत येथे आयोजित रक्तदान शिबिरात 126 भक्तांनी उत्फुर्त सहभाग घेतला.
    कार्यक्रमाचे उद्घाटन जतचे पोलीस उपविभाग अधिकारी सुनील साळुंखे साहेब यांचे हस्ते दिप प्रज्वलित करून झाले यावेळी बोलताना ते म्हणाले की देशाला शांती देण्याचे महान कार्य निरंकारी मंडळ करित आहे आपण आज पाहतो आहे जगामध्ये हिंसाचारापोटी अनेकांचे रक्त नाल्यामध्ये फुकटचे व्यर्थ जात आहे निरंकारी मंडळाचा उद्देश चांगला आहे रक्त नाल्यामध्ये न वाहता मानवांच्या नसामध्ये वाहिले पाहिजे आजच्या काळात मंडळाच्या विचारधारेची गरज आहे त्यांनी मिशनच्या मानवतावादी कार्यास शुभेच्छा दिल्या.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज रक्तपेढी मार्फत रक्त संकलन करण्यात आले. रक्तपेढीचे डॉ जगदीश कुमार रक्तदानाचे महत्त्व सांगताना म्हणाले की एका व्यक्तीने जर रक्तदान केले तर तीन लोकांना जीवनदान मिळु शकते.  यावेळी  देवराजजी काळे,स्टेट बँकेचे शाखाधिकारी रोहित नायकुडे, अविनाश साळुंखे,तहसील विभागाचे लक्ष्मण तोटावाड तसेच स्थानिक प्रबंधक व सेवादल अधिकारी उपस्थित होते. 
  त्यानंतर दुपारी आयोजित सत्संग समारोहामध्ये १०  वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विध्यार्थ्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पंचायत समिती जत चे गट विकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व कार्यक्रमाचे उत्तम नियोजन जत शाखेचे मुखी जोतिबा गोरे तसेच संभाजी साळे यांचे मार्गदर्शनाखाली  सेवादल स्वयंसेवकांचे सहकार्याने करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन