एस.टी. महामंडळ जत आगाराच्या ताफ्यात आलेल्या नव्या 25 एस.टी. बसेसचे लोकार्पण आ.विक्रम दादा सावंत यांच्या हस्ते पार पडला.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत:- एस.टी. महामंडळ जत आगाराच्या ताफ्यात आलेल्या नव्या 25 एस.टी. बसेसचे लोकार्पण आमदार विक्रम दादा सावंत यांच्या हस्ते पार पडला.                       ग्रामीण भागाची मुख्य अर्थवाहिनी म्हणून सदैव धावणाऱ्या या एसटी बसेसचे महत्त्व आपण सर्वचजण जाणतो. मात्र जत आगारातील अनेक बसेस दुरुस्तीस आल्याने व काही बसेस कालबाहय झाल्याने नव्या बसेसची मोठी गरज होती. या नव्या २५ एसटी बसेस जत आगारात दाखल झाल्याने प्रवाशांना विशेषतः खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना व नोकरदार व शेतकऱ्यांना  लाभ होणार आहे. 
     यावेळी बाबासाहेब कोडग, सुजय नाना शिंदे, बाबासाहेब माळी, अशोक बन्नेनवर, आगार प्रमुख कट्यारेजी, तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक रामाघरे, महादेव कोळी, राजू यादव, परशुराम मोरे, निलेश बामणे, दिनकर पतंगे, प्रांत कट्यारे साहेब,गट विकास अधिकारी सरगर,सलिम पाच्छापुरे,यांच्यासह प्रमुख मान्यवर, एस.टी.महामंडळाचे चालक वाहक कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन