आ.विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून बिळूर ता.जत येथील सौदागर तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्याने फुल्ल.
दिव्यराज न्युज जत :- मा.विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नातून बिळूर ता.जत येथील सौदागर तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरणेत आला. या पाण्याचे पूजन आ.विक्रमसिंह सावंत यांच्या शुभहस्ते करणेत आले. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालकांचा बिळूर येथे भव्य सत्कार करणेत आला यावेळी मा. सभापती बाबासाहेब कोडग, मा. पं.समिती सदस्य पिराप्पा माळी, मा.श्री.बाबा पाटील, मार्केट कमिटी सभापती सुजय नाना शिंदे ,मार्केट कमिटी संचालक बिराप्पा शिंदे, रमेश पाटील शिवकुमार तंगडी , यांच्या सह बिळूर येथील मान्यवर नागरिक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment