संत निरंकारी मिशनच्या वतीने खानापुर येथे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फौडेंशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन खानापुर येथे दिनांक ४ जुन २०२३ रोजी सकाळी ठीक ८:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे रक्तसंकलन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय मिरज यांचेमार्फत करण्यात येणार आहे. तरी रक्तदान शिबिरात आपले योगदान देऊन या मानवतेच्या महाकार्यात सहभागी व्हावे असे आवाहन निरंकारी मंडळामार्फत करण्यात आले आहे कार्यक्रम दरम्यान चहा नाष्टा याचीही सोय करण्यात आली आहे. 
   समयाच्या निरंकारी सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांचे आशीर्वादाने आध्यात्मिक जागृती बरोबर सामाजिक कार्यामध्ये मंडळाचे कार्य उल्लेखनीय आहे २४ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या महा रक्तदान अभियानात देशभरातील मंडळाच्या एक हजार शाखांमध्ये ५० हजारहून अधिक निरंकारी भक्तांनी स्वेच्छेने रक्तदान केले "मानवाला मानव प्रिय असावा एकमेकांचा आधार बनावा " या निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे शिकवणीनुसार स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर, नैसर्गिक  आपत्तीग्रस्थांना मदत अशी अनेक सामाजिक कार्ये मंडळामार्फत राबविण्यात येत आहे तरी या रक्तदान शिबिरात सर्वानी सहभाग घ्यावा असे अहवान खानापूर सेक्टर संयोजक श्री.दत्तात्रय जगताप यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन