गंधर्व गणेशोत्सव मंडळ जत तर्फे मल्लिकार्जून मेडेदार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- सांगली जिल्हा उद्योग केंद्र  येथील कार्यकुशल जिल्हा उद्योग अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मा. एम आर मेडीदार साहेब  हे वयोमानाने दि.31मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे गंधर्व मंडळ जत तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी   गंधर्व गणेशोत्सव मंडळ जतजे मा , शिवकुमार तंगडी,राजु कोरे महेश खटावे, सुनिल आरळी,सदा तंगडी, दिलीप सोलापूरे,शिवा गुजरे, मंकरद तिळल्याकर,सोनु कुलकर्णी, सिधराम लोहार, हंणमत खटावे, मदन पाटील, संजय कोळी, , अनिल बनकर,उपस्थित  होते.                  मेडेदार साहेब यांनी अतिशय तळमळ व प्रामाणिकपणाने कार्य करून हजारो बेरोजगार युवकांना, बचत गटांना, गोरगरीब गरजू महिलांना मार्गदर्शन करून, पंचायत समिती व  जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध योजना व आर्थिक मदत मिळवून देऊन  लहानसहान स्वयंरोजगार व्यवसाय, उद्योगधंदे उभा करण्यात मोलाची कामगिरी केली आहे. त्यामुळे अनेक महिला व तरुणांना रोजगाराची संधी मिळाली. आज ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांना पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य लाभो, सामाजिक व इतर क्षेत्रात  अधिकाधिक काम करण्याचे बळ मिळो ही ईश्वरचरणी  प्रार्थना!
सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना लाख लाख  शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन