जत तहसील सेतू कार्यालयातील सर्वर डाऊन मुळे जनतेचे हाल सुरू...विद्यार्थी व पालकांमधून संताप, दाखले मिळण्यास गैरसोय.

दिव्यराज न्युज नेटवर्क :- जत तालुक्यातील तहसील कार्यालय अंतर्गत सेतू महाईसेवा  शासनाच्या सर्व्हरमध्ये डाउनमुळे वारंवार अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे काही दाखल्यांना विलंब होत आहे. विद्यार्थी तहसील कार्यालयाच्या दररोज पायऱ्या झिजवत आहेत. 
नवीन शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी उत्पन्न दाखले, नॉन क्रिमिनिएल, जातीचे दाखले, आर्थिक दुर्बल घटक, असे अनेक दाखले लागतात याची पूर्तता झाल्याशिवाय कॉलेजमध्ये  आँडमिशन होत नाही.
शैक्षणिक प्रवेशाची मुदत संपत आल्याने दाखले दिल्याशिवाय महाविद्यालयत यांना प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक चिंताग्रस्त झाली आहे.
पालकांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता सर्व्हर डाउन आहे असे सांगितले जाते.
दरवर्षी प्रशासनामार्फत महा-ई-सेवा, सेतू केंद्राचे सर्व्हरमध्ये ऐन शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेवेळीच वारंवार बिघाड होत आहे. त्यामुळे शैक्षणिक कामासाठी आवश्यक असणारे दाखले मिळत नाहीत.त्यामुळे 
पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जतचे तहसीलदार जिवन बनसोडे यांनी लक्ष घालुन सर्वर डाऊन मुळे होणारे अडचणी दूर कराव्यात अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन