आयएमए'च्या जत शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. रोहन मोदी
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जत शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. रोहन मनोहर मोदी यांची फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी श्रीमती नयनतारा बिज्जरगी यांची निवड करण्यात आली.
ही निवड इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रविंद्र कुटे यांच्या उपस्थितीत पार पडली. इतर कार्यकारिणी अशी: उपाध्यक्षा - श्रीमती डॉ. नयनतारा बिज्जरगी, सेक्रेटरी - डॉ. शरद पवार, खजिनदार - डॉ. मल्लिकार्जून काळगी अशी कार्यकारणी निवड करण्यात आली. कोरोना काळात डॉ. रोहन मोदी यांनी आयएम्ए च्यावतीने रुग्णालय सुरू करुन कोरोना रुग्णांची गैरसोय दूर केली. वृक्षारोपण, आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर व आरोग्याविषयी व्याख्याने असे अनेक उपक्रम राबविल्याने डॉ. मोदी यांची फेरनिवड करण्यात आली. यावेळी डॉ. मनोहर मोदी, डॉ. सी. बी. पवार, डॉ. विद्याधर पाटील, डॉ. हरीश माने, डॉ. राजाराम गुरव, डॉ. कैलास सनमडीकर, डॉ. मिनाक्षी पवार, डॉ. उमा पाटील यांच्यासह जत तालुक्यातील अनेक डॉक्टर्स उपस्थित होते.
Comments
Post a Comment