महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोशियन तर्फे तालुकास्तरावर तालुका प्रमुखांची निवड होणार- सचिव विजय बिरादार

दिव्यराज न्युज नेटवर्क:- सांगली जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून खेळाडू निर्माण व्हावेत तसेच राज्य व राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एका व्यक्तीची निवड तालुकाप्रमुख पदी करण्यात येणार आहे अशी माहिती सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विजय बिराजदार यांनी सांगितले सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट हे राष्ट्रीय शालेय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे संलग्न असून जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील खेळाडू असोसिएशन अधिकृत जिल्हा ,विभाग ,राज्य आणि राष्ट्रीय खेळाडूंना खेळण्याची संधी दिली आहे टेनिस क्रिकेट असोशियन महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून तालुकास्तरावर तालुका प्रमुख म्हणून कार्य करण्यासाठी इच्छुक क्रीडाशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक ,खेळाडू , क्रिकेट क्लब प्रशिक्षक यांनी जिल्हा संघटनेशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव - विजय बिराजदार मो न   ( 7745019792 ) यांच्याशी संपर्क साधावे असे आव्हान करण्यात आले आहे .यावेळी सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार -  विक्रमसिंह दादा सावंत , कार्याध्यक्ष - परवेज गडीकर , उपाध्यक्ष - अझहरुद्दीन शेख व संघटनेचे महंमदहुसेन शेख सर , धनंजय काटे सर , नामदेव बेळे सर , सिद्धेश्वर कोरे सर , महादेव सवाईसर्जे सर , स्वप्नील सुर्वे सर , संजय कोळी सर , सुनील सराटे , रवींद्र व्यवहारे सर हे सर्व पदाधीकारी उपस्तीत होते .

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन