एस टी महामंडळाचा ७५ वा वर्धापन दिनांनिमित्त जत येथे "जागर फाऊंडेशन" चा जंबो स्वछता मोहिम, परसुराम मोरेंची विषेश उपस्थिती.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- (राजू ऐवळे) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या जत आगार (एस टी) महामंडळाचा ३ जून रोजी ७५ वा वर्धापन दिनानिमित्त "जागर फाऊंडेशन" च्या वतीने महा स्वच्छ्ता मोहिम राबविण्यात आले. या मोहिमेस जत नगरपरिषेदेचे  मा सभापती व भावी नगराध्यक्ष परसुराम मोरे यांची विषेश उपस्थिती होती.
 या जंबो  स्वच्छ्ता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जागर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम भैय्या मोरे यांना सुनंदा देसाई जत आगार प्रमुख यांनी केले होते.त्या आवाहनाला प्रतिसाद देत जागर फाऊंडेशनच्या वतीने जत आगार परीसर स्वच्छ करण्यात आला.
      स्वच्छ्ता मोहिमेनंतर बोलताना आगार प्रमूख देसाई म्हणाल्या, जागर फाऊंडेशन चे आभार मानावे तेवढे कमीच आहे कारण आज खऱ्या अर्थाने जत आगार परीसरातील कानाकोपरा स्वच्छ झाला आहे.
    या स्वच्छ्ता मोहिमेत जागर फाऊंडेशन चे अरुण साळे,गोपाळ पाथरुट, बाळू कांबळे,अबास मुजावर, आनंद कांबळे, अभिनंदन साबळे,अमोल पवार,अभिषेक कांबळे, निखिल कलाल,विजय मोरे,अर्जुन चव्हाण,कृष्णा चव्हाण. दत्त रिक्षा स्टॅ 
तसेच प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन