विवेक कांबळेचा बाबासाहेब काटे यांच्यावतीने सत्कार.
दिव्यराज न्युज जत - मंगळवेढा तालुक्यातील सिद्धनकेरी येथील विवेक राधेश्याम कांबळे याने उच्च माध्यमिक परीक्षेत (विज्ञान शाखेत) 78.50 टक्के व नीट परीक्षेत 526 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते व स्टॅम्पव्हेंडर बाबासाहेब यशवंत काटे व छाया काटे यांनी त्याचा सत्कार केला.
भारताची संविधान प्रत आणि शाल, हार आणि गुच्छ देऊन विवेकचा सत्कार करण्यात आला. यावेळी विवेकचे आई-वडील (कल्पना- राधेश्याम) उपस्थित होते.
बाबासाहेब काटे म्हणाले की, राधेश्याम कांबळे यांना2 मुले आणि एक मुलगी आहे. त्यांची विश्वास आणि श्रद्धा या दोघांनी यापूर्वी नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. आता विवेकदेखील वैद्यकीय शिक्षण घेणार आहे. राधेश्याम हे शिक्षक आहेत. एका शिक्षकाची सर्वच मुले डॉक्टर होत आहेत, ही समाजातील एक दुर्मिळ गोष्ट आहे.
Comments
Post a Comment