पोलिस अधिक्षक बसवराज तेली यांचा होलार संस्थेतर्फे सत्कार.

दिव्यराज न्युज नेटवर्क जत :-  होलार समाज सामाजिक संस्था पुणे ,संस्थेच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून  सन्मान झाला. २०२२-२३ या वर्षात उल्लेखनिय काम करणारे पोलिस अधिकारी बसवराज तेली यांचा सन्मान सांगली पोलिस मुख्यालय येथे करण्यात आला. सांगली जिल्हा येथील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यामध्ये अवैद्य धंदे, चोऱ्या तसेच अनेक लोकांना तसेच अनुसूचित जाती जमातील होलार समाजाचे दादासो गेजगे दरीबडची यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य सामाजात चांगल्या पध्दतीने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम सांगली जिल्ह्यात त्यांचा माध्यमातून होत असल्याने त्यांचा गौरव म्हणून आपणास होलार समाज सामाजिक संस्था, पुणे रजि नं ५३४५२ तर्फे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला
  भावी जीवनातील यशस्वी कार्यासाठी मन:पूर्वक सस्नेह हार्दिक शुभेच्छा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव श्रीरंग ऐवळे तसेंच अविनाश वाघमारे,  शेडयाळचे सरपंच भगवानदास केंगार, ज्येष्ठ नेते जेष्ठ नेते सदाशिव ऐवळे आदर्श सरपंच कमलापूर व पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभहस्ते भारताचे संविधान ग्रंथ व कर्तव्यदक्ष अधिकारी  म्हणून सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

संत निरंकारी मिशन जत येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

माजी आमदार कै. उमाजीरव सनमडीकर यांच्या ८४वा जयंती निमित्त सांधे व गुडघेदुखीवर कमल रूग्णालयात दि. २२ पासून आरोग्य तपासणी शिबीर- डाँ कैलास सनमडीकर.

जत येथे संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन