आसुन आडचण नसून खोळांबा जत तालुक्याची अवस्था, प्रांताधिकारी व मुख्याधिकारी रिक्तपद भरा अन्यथा आंदोलन करु - प्रहार अध्यक्ष सुनिलराव बागडे.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- जत येथील प्रांताधिकारी व मुख्याधिकारी ह्या दोन्ही जागा रिक्त आहेत. या जागेवर प्रभारीची नेमणूक केले आहेत परंतु पद प्रभारी असल्याने कोणीही काम करण्यासाठी तयार नाहीत. आसून आडचण नसून खोळांबा अशी जत तालुक्याची अवस्था झाली आहे. म्हणून या दोन्ही जागा त्वरित न भरल्यास प्रहार संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडू असा इशारा प्रहारचे तालुका अध्यक्ष सुनीलराव बागडे यांनी दिला आहे. विस्ताराने मोठ्या असलेल्या जत तालुक्यात अनेक शासकीय पदे रिक्त आहेत. यामुळे नागरिकांची कामे गतीने होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत सध्या प्रांताधिकारी व मुख्याधिकारी या पदावर प्रभारी नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे पूर्ण वेळ प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांच्या नेमणुका लवकर कराव्यात अशी मागणी नागरिकांच्या मधून होत आहे. जत तालुक्यात महसूल विभागाच्या महत्वाच्या व मुख्य अशा कार्यालयात प्रांताधिकारी पदसुद्धा प्रभारी आहे. अनेक शेतकरी, व्यापारी नागरिकांची विविध शासकीय कामे ठप्प आहेत. वेळेत कामे होत नसल्याने अनेकांच्या अडचणी वाढत आहेत. जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद हे सध्या प्रभारी आहे. सुमारे ५० हजाराच्या वर लोकसंख्या असणाऱ्या जत नगरपरिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळू शकला नाही. त्यामुळे शहरातील अनेक नागरिकांची, विद्यार्थ्यांची, व्यापाऱ्यांची कामे वेळेत होत नाहीत. वेळेत कामे होत नसल्याने अनेकांच्या अडचणी होत आहेत.
Comments
Post a Comment