जत शहरात डेंग्यूचा फैलाव, कचरा गाड्या गायब; गटारी तुडुंब भरल्या, वाली कोण? जागर फाऊंडेशनचे सवाल.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत:- शहर परिसरात स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अस्वच्छता, डास फवारणीचा अभाव, यामुळे शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठ्या गतीने वाढू लागली आहे. तसेच घंटा गाड्या गायब झाल्याने साठणाऱ्या कचऱ्यातून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासप्रतिबंधक औषध फवारणी प्रभावीपणे होत नाही. जर लोकांना सुविधा नाही दिला तर नगरपालीकेसमोर कचर्याची डिग लावून आंदोलन करू असा इशारा जागर फाऊंडेशन चे अध्यक्ष परशुराम भैया मोरे यांनी दिला आहे.
अनेक प्रभागांतून महिना महिना फवारणी झाली नसल्याच्या तक्रारी आहेत." किरकोळ आजार आहे, असे समजून तात्पुरती औषधे घेतलेल्या शेकडो रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत जाण्याची वेळ येत आहे. रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होत आहे. त्यानंतर अनेक रुग्ण मोठ्या हॉस्पिटलमधून दाखल होत आहेत.रुग्णांना हजारो रुपयांची बिले भरावी लागत आहेत. चिकुनगुनिया आणि त्यात डेंग्यू या आजाराची भर पडल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर डासप्रतिबंधक धूर फवारणी व औषध फवारणी होणे आवश्यक आहे. मात्र औषध फवारणीसाठी कोणीही फिरकले नसल्याच्या तक्रारी आहेत. अर्थात प्रत्येक नागरिकांनी व कुटुंबाने देखील
स्वतः आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. मोकळी टायर, कुंड्या, नारळाची बेल्टी, काचेची भांडी यांच्या पाण्यात या डासांची उत्पत्ती होत आहे.
कचरा संकलनातही दिरंगाई..
घरगुती कचरा संकलन करणाऱ्या गाड्यां बंद झाल्याने यातून साचून राहिलेल्या ओल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण होत आहे.तसेच डासप्रतिबंधक फवारणीचा अभाव आहे.
Comments
Post a Comment