मनोहर भिडेवर राज्य सरकारने कारवाई करावी-आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष विकास काका साबळे.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- भारत देशाचा तिरंगा देशाचे राष्ट्रगीत राज्यघटना व देशातील महापुरुषांच्या बद्दल व समाजसुधारकांच्या बद्दल वेळोवेळी अपशब्द वापरून अपमानित करणाऱ्या व वेगवेगळ्या धर्मात जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक विधान करणाऱ्या संभाजी उर्फ मनोहर भिडे या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो यापूर्वीसुद्धा बऱ्याच महापुरुषांच्या वरती अश्लील भाषेत व विकृत पद्धतीने वक्तव्य केलेले आहेत महिला पत्रकारांना सुद्धा अपमानित केल्याबद्दल यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळा वादळ झाले होते परंतु यांचे वरती कोणते प्रकारचे कारवाई न झाल्यामुळे काहीही बरळत सुटण्याचा सपाटाच लावलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने व केंद्र सरकारने याची योग्य दखल घेऊन संभाजी उर्फ मनोहर भिडे यांना अटक करून जास्तीत जास्त कठोर शिक्षा करावी संभाजी भिडे यांच्यामुळे दोन समाजात दरी निर्माण होत आहे. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्व समाज धार्मिक सण उत्सव जुन्या गोविंदाने सर्वजण मिळून करतात परंतु अशा विकृत बुद्धीच्या व्यक्तीमुळे समाजात भेदभाव निर्माण होत आहे श्री भिडे यांच्या वरती कठोरात कठोर कारवाई व्हावी
Comments
Post a Comment