दुसरे बळीराजा साहित्य संमेलन -जत २०२३.
दिव्यराज न्युज नेटवर्क जत :- दुसरे बळीराजा साहित्य संमेलन जत २०२३
या बळीराजा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून वेगळ्या 'बळीराजा साहित्या'ची गरज का आहे? त्यासंदर्भातील भूमिका मांडली.
बळीराजा साहित्य हे नवीन साहित्य प्रवाह वा साहित्यामध्ये 'सवता सुभा' निर्माण करणार नाही तर सर्वच साहित्य प्रवाहामध्ये 'शेती पर्यावरणा'चे पडलेले प्रतिबिंब अधोरेखीत करेल वा ठळक करेल.
प्रचलित साहित्यामध्ये 'शेती पर्यावरण' हे नांगराच्या शेतीपासून सुरु होते. आणि नांगराच्या शेतीनंतरच उत्पादनाची वरकड वाढते आणि सभ्यता व संस्कृती निर्माण होते, हा एक अनैतिहासिक सिद्धांतही प्रचलित आहे.
भारतामध्ये सिंधु नदीच्या खोऱ्यामध्ये नांगराची शेती सुरु होते ४८०० वर्षापूर्वी आणि हस्तश्रमाची शेती सुरु होते त्यापूर्वी १०००-१५०० वर्षापूर्वी. आणि सिंधु सभ्यता उभी राहते नांगराची शेती सुरु होण्याच्या ५००-६०० वर्षापूर्वी.
याचा अर्थ नांगराच्या शेती अगोदरच वरकड उत्पादन ५००-६०० वर्षापूर्वी सुरु होऊन सभ्यता वसवली गेली होती.
त्यामुळे हा १०००-१५०० वर्षाचा इतिहास साहित्यात प्रतिबिंबीत झाला पाहिजे. कारण या सभ्यतेने संस्कृती, गणित, विज्ञान, साहित्य, कला यांची मेढ रोवली आहे.
म्हणून बळीराजा साहित्याचा, या संमेलनाचा अट्टाहास.
Comments
Post a Comment